आमची सेवा
बारकोडसह जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र
जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्रांवर बारकोड दिसेल. तुम्ही जगात कुठूनही बारकोड स्कॅन केल्यास, तुम्हाला प्रमाणपत्राची मूळ प्रत दिसेल. त्यावर अधिकृत डिजिटल स्वाक्षरी, तारीख आणि वेळ उपलब्ध आहे. पूर्ण सुरक्षितता. ग्रामपंचायत लॉगिन आणि अधिकारी लॉगिन स्वतंत्र.
नमुना क्रमांक ८ आणि ९
नमुना क्रमांक ८ तयार करणे, Home tax update करणे, नमुना नंबर, नवीन मालमत्ता समाविष्ट करणे, इत्यादी. नमुना नंबर ८ आणि ९ शी संबंधित सर्व कामे.
कर व्यवस्थापन
ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या करात वाढ करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायत करात वाढ करता येईल. आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न अचूक कर आकारणीने वाढवता येते.
ग्रामपंचायत दस्तऐवज व्यवस्थापन
दैनंदिन वापरातील दस्तऐवज जसे की प्रोसीडिंग बुक आणि इतर पुस्तकांची पद्धतशीरपणे मांडणी केली जाते.
सोप्या कामासाठी डेटा प्रोसेसिंग
तुम्हाला हवी असलेली कोणतीही नोंदणी फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे. जुनी नोंदणी प्रत मोबाईलवर उपलब्ध आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा नोंदणी रजिस्टरमध्ये जाण्याची गरज नाही.
दस्तऐवज स्कॅनिंग:
ग्रामपंचायतीमधील जुने जन्म, मृत्यू, लग्नाच्या नोंदी जे जीर्ण अवस्थेत आहेत परंतु अत्यंत महत्त्वाचे आहेत, आम्ही त्या नोंदी जसेच्या तसे स्कॅन करतो आणि डेटा lifetime डिजिटल स्वरूपात जतन करून पुस्तक बांधणी सुद्धा करतो. ही सर्व कामे तुमच्या ऑफिस मध्ये होईल.